Wednesday, May 25, 2011

तुम्हीसुद्धा म्हातारे व्हाल ( real story )


मी वैभव, मी एकदा खासगि कामासाठी एका प्राथमिक शाळेत गेलो. तेथील दृष्य पाहून मन हेलावून गेले. शाळेमध्येच अंगणवाडीची एक खोली आहे.
त्या खोलीच्या व्हरांड्यातून येणाऱ्या एका क्षिण, आर्त हाकेने माझे लक्ष वेधले. व्हरांड्यात काही भांडीकुंडी, एक दोन वळकट्या, कधीकाळी लुगडी असावीत अशा मळकट चिंध्या असं बरंच सामान आणि त्या सामानाजवळ एक जीर्ण शरीर कण्हत होतं, पाण्यासाठी हाका मारत होतं.
म्हातारीचॆ ते शब्द थेट मेंदूपर्यंत पोहचले, " कोणीतरी पाणी द्या रे, जेवण, चहा नका देऊ
पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, जीव कोरडा झाला, कोणीतरी पाणी द्या रे. "
म्हातारीने कदाचित बरेच दिवस झाले


अंघोळही केली नसेल, मी माझ्या सोबत नेलेले बिस्लरीचे पाणी तिच्या भांड्यात ओतले तेंव्हा ती म्हणाली, "एवढ्या पाण्याने कसं भागेल साहेब, उन्हाळ्याचे दिवस आहेत
दिवसभर काय पिऊ?" मला कसंतरीच वाटलं.
मी रस्त्याने जाणाऱ्या एका गृहस्थाकडे चौकशी केली असता समजले की म्हातारीला तीन मुले असून चांगले सधन आहेत, शेतीबाडी असून घरी शेळ्या मेंढ्या आहेत सोबत दोन दोन कुत्रे आहेत पण म्हातारीला वागवत नाहीत.
मला ऐकून खूप संताप आला की माणूस आज कुत्र्यांना वागवतो पण जन्मदात्या थकलेल्या, असहाय आईला चक्क वाऱ्यावर सोडतो.मन विषण्ण करणारी ही बाब होती.
परमेश्वरा, जसा मुलांना जन्म दिल्याबरोबर आईला त्यांच्याप्रती वात्सल्य, प्रेम, आपुलकीची भावना देतो तसेच त्या अपत्यांना एखादी सहानुभूतीची भावना दे जी जन्मदात्यांच्या हयातभर टिकेल आणि
त्या भावनेपोटी ते जन्मदात्यांची काळजी घेतील.

म्हाताऱ्या आईवडिलांचा
सांभाळ करा, त्यांची हेळसांड
करू नका. याद राखा, तुम्हीसुद्धा म्हातारे व्हाल

 

No comments:

Post a Comment